Share

…..यामुळे आयपीएल स्पर्धा भारतात आयोजीत केली, गांगुलीने दिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.

आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्पर्धा अनिश्चीत काळासाठी स्थगित करण्यात आली. स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की आल्यानंतर आयपीएल आणि बीसीसीआयच्या मंडळावर स्पर्धा भारतात आयोजीत करण्यावरुन टिका होऊ लागली. यावर प्रथमच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावेळी स्पर्धेचे नियोजन केले त्यावेळी भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती तसेच आयपीएल आधी इंग्लंड दौऱ्याचे यशस्वीपणे आयोजन केले त्यामुळे भारतात आयपीएल स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोना काळात भारतात आयपीएल स्पर्धा आयोजीत करणे म्हणजे असंवेदनशील होते असे अनेकांचे मत होते. कोरोनाच्या काळातही आयपीएल स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने आयपीएलला गाठले आणि दुसऱ्या दिवशी बीसीसीआयने तातडीची बैठक बोलावली आणि आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची घोषणा केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!