Share

एप्रिलमधील आयसीसी सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या स्पर्धेत पाकच्या खेळाडुंना नेपाळच्या खेळाडुचे आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयसीसीने एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटुंच्या पुरस्कारासाठी नामांकने जाहिर केली आहे. या नामाकंनात दोन पाकिस्तानी क्रिकेटपटु आणि एका नेपाळच्या क्रिकेटपटुला नामांकन मिळाले आहे.

आयसीसीच्या एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेपटूच्या पुरस्कारासाठी जाहीर केलेल्या नामांकनात पुरुष गटात पाकिस्तानच्या बाबर आझम, फखर जमान आणि नेपाळच्या कुशल भुर्तेल यांचा समावेश आहे. जानेवारी पासुन सुरु झालेल्या पुरस्कारात यंदा पहिल्यांदाच कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले नाही. कारण आयपीएल स्पर्धेमुळे एप्रिल महिन्यात भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंचा एप्रिल महिन्याच्या या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला नाही.

तर सर्वेत्तम महिला क्रिकेपटूच्या पुरस्कारासाठी ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हेली, मेगन शट आणि न्यूझीलंडच्या लेह कास्पेरेक यांना नामांकन मिळाले आहे. एप्रिलमध्ये हेलीने न्यूझीलंडविरुद्ध ३ एकदिवसीय सामने खेळले. यात हेलीने ५१.६६ च्या सरासरीने १५५ धावा तर मेगन शटने याच मालिकेत ७ गडी बाद केले होते. तसेच न्युझीलंडची लेह कास्पेरेकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ एकदिवसीय सामन्यांत ९ गडी बाद केले होते. तसेच एका सामन्यात ४६ धावा देत ६ गडी बाद केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!