चेन्नई : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा १३ धावांनी पराभव केला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय असुन गुणतालीकेत पहिल्या स्थानावर मुंबईने झेप घेतली आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघाचा हा सलग तिसरा पराभव झाला असुन ते गुणतालीकेत सर्वात शेवटच्या म्हणजे आठव्या स्थानी आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मागील सामन्यात स्विकाराव्या लागलेल्या पराभवामुळे काही बदल केले होते. या सामन्यात त्यांनी तब्बल चार खेळाडू बदलले होते. हैदराबादने जेसन होल्डर, शाहबाज नदीम, टी नटराजन आणि वृद्धिमान सहा या खेळांडूना संघाबाहेर काढत त्यांच्याजागी अभिषेक शर्मा, विराट सिंग, खलील अहमद आणि मुजीब उर रहमान या खेळांडुना संधी दिली. यावेळी हैदराबादच्या अनेक चाहत्यांनी नटराजनला संघाबाहेर ठेवल्याने नाराजी व्यक्त केली होती.
यावर हैदराबाद संघाचे डायरेक्टर टॉम मुडी यांनी खुलासा देत म्हणाले की,’नटराजनला संघातून वगळण्याचे कारण त्याची कामगीरी नव्हती. मागील सहा महिन्यापासून क्रिकेट खेळत असल्याने संघ व्यवस्थापनाने त्याला मुंबई विरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएल स्पर्धा खुप मोठी असते त्यामुळे त्याच्या फिटनेसविषयी आम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिलेल्या १५१ धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ १३ धावांनी पराभुत झाला.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाचे गांभीर्यच नाही; शिरूरमध्ये संचारबंदितही लोकांचा मुक्त संचार
- सलग विजयानंतर हॅटट्रिकसाठी सज्ज असलेल्या आरसीबीसाठी आनंदाची बातमी
- रेमडेसविरचा मोठा साठा पडून, केंद्राने ‘तो’ साठा उपलब्ध करून द्यावा – मनसे
- …तर ऑलम्पिकमध्ये महिला व पुरुष दोन्ही क्रिकेटचे संघ खेळणार
- बीडमध्ये राबवले जाणार ‘मिशन झीरो डेथ’ अभियान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

