Share

कोरोनाचे गांभीर्यच नाही; शिरूरमध्ये संचारबंदितही लोकांचा मुक्त संचार

Published On: 

बीड: राज्यात तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, या वाढत्या रुग्ण संख्येला रोखण्यासाठी प्रशासनाच्या नाकी नऊ येत असले तरीही नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य असल्याचे अजूनही काही ठिकाणी दिसत नाहीये. कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे तरी देखील बीड जिल्ह्यातील शिरूर येथील नागरिक संचारबंदितही मुक्त संचार करत असल्याचे दिसून आले आहे.

शिरूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या संचारबंदीचा काही उपयोग होताना दिसत नाहीये. अत्यावश्यक सेवांचा आधार घेत अनेक जन औषधी, किराणा, दवाखाना असा बहाना करून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन मध्ये लोकांनी सहकार्य केले मात्र या वेळेस आता त्याचे गांभीर्य नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

सुरक्षीत राहण्यासाठी कोरोना नियम पाळावेत असे आवाहन एपीआय डॉ रामचंद पवार यांनी केले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली व विविध कारणे देऊन नागरिक विनाकारण घराबाहेर पडून फिरत असतील तर आता प्रशासनाला आणखी कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. यापुढे विनाकारण फिरणाऱ्यांवरआपत्ती व्यवस्थापन कायदा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती एपीआय डॉ रामचंद पवारयांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!