मुंबई : बर्मिंघम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेटचा संघ सहभागी होणार हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सर्वोच्च समितीने स्पष्ट केले आहे. तसेच जर २०२८ साली होणाऱ्या लॉस अँजेलिस येथे होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत जर क्रिकेटता समावेश झाला तर त्या स्पर्धेत महिला आणि पुरुष दोन्ही संघ पाठवले जाईल. याआधी यावरुन बरीच चर्चा झाली होती.
सुत्राच्या माहितीनुसार, भारतीय महिला क्रिकेट संघ बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत खेळेल.आणि जर क्रिकेटचा समावेश २०२८ लॉस अँजलिस ऑलिंपिकमध्ये झाल्यास पुरुष व महिला दोन्ही संघ यात सहभागी होतील. क्रिकेटच्या ऑलम्पिकमध्ये समावेशावरुन यापुर्वी अनेकदा चर्चा झाली होती. मात्र क्रिकेटचा समावेश करण्यास मनाई करण्यात आली होती. यामागे कारण होती सामन्याचा कालावधी एकदिवसीय सामने आणि कसोटी सामने ऑलम्पिकमध्ये समाविष्ट होणे शक्य नाही. मात्र क्रिकेटचा टी-२० हा नवीन प्रकार समाविष्ट होउ शकतो. असा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या बीसीसीआयच्या वर्चुअल बैठकीत घेण्यात आला.
#ICC is pitching #Cricket for the 2028 LA Olympics.. #India 's #BCCI finally agreed to support #ICC efforts..
— Ramesh Bala (@rameshlaus) April 18, 2021
बीसीसीआयच्या या बैठकीत भारताचा महिला क्रिकेट संघ हा २०२१ वर्षाच्या आखेरीस ऑस्ट्रेलीया दोऱ्यावर जाणार अशी घोषणा देखील करण्यात आली. मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यां दोघी संघाचे नेतृत्व करतील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. तसेच महिला एकदिवसीय विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडचा दौरा पण होईल असे सांगण्यात आले. अशी माहिती एका खासगी वृत्तसंस्थेने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- एका व्यासायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव ! त्यांचा दोष काय? काँग्रेसचा फडणवीस-दरेकरांना सवाल
- पोलार्डने मारला या मोसमातील सर्वात लांब षटकार : पहा व्हिडिओ
- जालना जिल्ह्यात जुगार अड्ड्यावर छापा; ढाब्यावर अवैधरीत्या सुरू होता जुगार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना फोन, महाराष्ट्रासाठी महत्वाचं आश्वासन !
- ‘या’ विजयामुळे मुंबई अव्वल स्थानी ; कोहली आणि धोनीच्या टीमला फटका


