बीड: जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या साथीचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे, या वाढत्या संख्येला आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना सध्या स्थानिक प्रशासन राबवत आहे. याचाच एक भाग म्हणजे ‘मिशन झीरो देथ’ हे अभियान आता जिल्ह्यात १९ एप्रिल ते १० मे या कालावधीत राबवले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी ही माहिती दिली.
मिशन झीरो डेथ या अभियानाचा हेतू असा की, कोरोना बाधितांचा वेळेत शोध घेवून त्यांना वैद्यकीय सुविधा व औषधोपचार पुरवण्याबरोबरच प्रशासकीय अथवा क्लिनिकल कारणामुळे होणारे मृत्यू कमी करणे व शून्यावर आणणे. कोरोनाचे लक्षणं असलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, त्यांच्या वेळेवर टेस्ट करणे, त्यांना त्वरित औषधोपचार तसेच वैद्यकीय सेवा देणे व त्या योगे मृत्यूचे प्रमाण कमी करून ते शून्यावर आणण्याच्या दृष्टीने ‘मिशन झिरो डेथ’ अशी मोहीम राबवली जाणार आहे.
या मिशनचा पहिला टप्पा १९ एप्रिल ते १० मे असा असणार आहे. यादरम्यान ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येकी १०० घरांमागे २ शिक्षकांची नेमणूक करुन त्यांच्यामार्फत सर्व शंभर कुटुंबे व कुटुंबातील सर्व सदस्य यांचे सर्वेक्षण केले जाणारे आहे. प्रतिदिन १०० या प्रमाणे सर्वेक्षण पुर्ण करुन नंतर त्याच पध्दतीने आठवड्यातून दोन वेळा असे एकुण अभियान कालावधीत किमान तीन वेळा कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- एका व्यासायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव ! त्यांचा दोष काय? काँग्रेसचा फडणवीस-दरेकरांना सवाल
- पोलार्डने मारला या मोसमातील सर्वात लांब षटकार : पहा व्हिडिओ
- जालना जिल्ह्यात जुगार अड्ड्यावर छापा; ढाब्यावर अवैधरीत्या सुरू होता जुगार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना फोन, महाराष्ट्रासाठी महत्वाचं आश्वासन !
- ‘या’ विजयामुळे मुंबई अव्वल स्थानी ; कोहली आणि धोनीच्या टीमला फटका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

