मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने देशातील रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे देशातील तुटवडा कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रुग्णांची वाढती संख्या व काही परवानग्यांअभावी निर्यात प्रक्रियेतील रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा साठा पडून असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून महत्वाची मागणी केली आहे.
निर्यात बंदीमुळे निर्यातीसाठी असलेला रेमडेसविर चा मोठा साठा पडून आहे. परंतु तो अजून विकायची परवानगी नाही , त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने आवश्यक ती परवानगी घेऊन तो साठा त्वरित उपलब्ध करून दिल्यास मोठया प्रमाणात सोय होईल.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) April 15, 2021
‘निर्यात बंदीमुळे निर्यातीसाठी असलेला रेमडेसविर चा मोठा साठा पडून आहे. परंतु तो अजून विकायची परवानगी नाही , त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने आवश्यक ती परवानगी घेऊन तो साठा त्वरित उपलब्ध करून दिल्यास मोठया प्रमाणात सोय होईल.’ अशी मागणी नांदगावकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तर मुंबईत कर्नाटकातील लोकांना व्यापार-उद्योग चालवणे कठीण होईल; राऊतांचा ‘रोखठोक’ इशारा
- विराटच्या विजयाचा रथ रोखण्याचे मॉर्गनपुढे आव्हान; सुपर संडे मध्ये आज आरसीबी-केकेआर भिडणार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना फोन, महाराष्ट्रासाठी महत्वाचं आश्वासन !
- एका व्यासायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव ! त्यांचा दोष काय? काँग्रेसचा फडणवीस-दरेकरांना सवाल
- पोलार्डने मारला या मोसमातील सर्वात लांब षटकार : पहा व्हिडिओ


