Share

सलग विजयानंतर हॅटट्रिकसाठी सज्ज असलेल्या आरसीबीसाठी आनंदाची बातमी

Published On: 

मुंबई : आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यात विराट कोहलीचा बेंगलुरु रॉयल चॅलेंजर्स हा संघ अजिंक्य आहे. आरसीबीने लागोपाठ मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघाना पराभुत करत स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावला नाही. आज होणाऱ्या सामन्यात केकेआरच्या संघाला नमवुन विराटसेना हॅटट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. मात्र या सामन्यापुर्वी आरसीबीसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

आयपीएलची दणक्यात सुरु केलेल्या आरसीबी संघात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलु खेळाडू डॅनियल सॅम्स संघाला येऊन मिळाला आहे. सॅम्सचा ७ एप्रिल रोजी कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. पहिला अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर दुसऱ्यांदा त्याचा अहवाल पॉझिटीव्ह अल्याने त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या दरम्यान तो सतत वैद्यकीय पथकाच्या संपर्कात होता. कोरोनाच्या सर्व नियमाचे त्याने व्यवस्थित पालन केले होते. मात्र आजच्या सामन्यापुर्वी तो कोरोनावर मात करुन संघात परत आला आहे.

वैद्यकीय पथकाच्या तपासणीनंतर १७ एप्रिलला तो आरसीबीच्या ताफ्यात सामिल झाला आहे. डॅनियल सॅम्सने आतापर्यंत ५४ टी-२० सामन्यात १४८च्या स्ट्राइक रेटसह ४८५ धावा केल्या आहेत. आहे. तसेच गोलंदाजीमध्ये सॅम्सने २२.१७ च्या सरासरीने ६७ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने दोन वेळा एका डावात ४ बळी घेतले आहेत. युएईमध्ये झालेल्या गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये तो दिल्लीकडून ३ सामने खेळला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!