🕒 1 min read
पुणे : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापुरात जाणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आहे. तर, आज सकाळपासूनच मुंबई पोलिसांनी सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
आपल्याला घराबाहेर जाऊ दिलं जात नसून पोलीस मला अटक करण्याच्या तयारीत आहेत. हे सर्व बेकायदेशीर असून कोल्हापूरमध्ये मला जिल्हाबंदी आहे, मात्र मला मुंबईत देखील पोलीस घराबाहेर पडू दिलं जात नाहीये, असं किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. सोमय्यांवर होत असलेली ही कारवाई बेकायदेशीर असल्याचं म्हणत भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आता पुणे भाजप शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी देखील राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘भाजपा नेते किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करणाऱ्या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध. ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, मुघलांची नाही हे लक्षात असू द्या. सामान्य जनतेचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही, कितीही दबाव आणला तरी आम्ही तुमचे सर्व भ्रष्टाचार बाहेर काढणारच,’ असा इशारा जगदीश मुळीक यांनी सरकारला दिला आहे.
भाजपा नेते @KiritSomaiya यांना स्थानबद्ध करणाऱ्या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध. ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, मुघलांची नाही हे लक्षात असू द्या. सामान्य जनतेचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही, कितीही दबाव आणला तरी आम्ही तुमचे सर्व भ्रष्टाचार बाहेर काढणारच !#KiritSomaiya pic.twitter.com/Y5EXUs4YTz
— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) September 19, 2021
देवेंद्र फडणवीसांनी दिला संघर्षाचा इशारा
‘माजी खा. किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील,’ अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘वसुलीचा आरोप असलेले माजी गृहमंत्री गायब, मात्र भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या सोमय्यांवर कारवाई’
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- अफगाणिस्तानमध्ये भारतीय गुंतवणूक सुरु राहणार?; गडकरींनी दिले उत्तर
- काँग्रेसचे धक्कातंत्र; चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
- महामारीची भैरवी झाली; आता नाटकाच्या नांदीसाठी कान आतूर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
