🕒 1 min read
नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत असतानाच काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदासाठीचं नवं नाव जाहीर केले आहे. दरम्यान काल पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला.
खरतर अमरिंदर सिंगआणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद पाहायला मिळत होता. पक्ष श्रेष्ठींनी मध्यस्थी करून देखील सिद्धू हे खोड्या काढत असल्याचे दिसत होते यामुळेच वैतागून अखेर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान त्या नंतर मुख्यमंत्री पदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा यांचंच नाव सर्वाधिक चर्चेत होतं. तेच मुख्यमंत्री होतील अशी जोरदार शक्यता होती.
परंतु आता पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे विधीमंडळ गटनेते म्हणूनही निवड करण्यात आल्याचं हरीश रावत यांनी जाहीर केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी ट्विट करून चरणजीतसिंग चन्नी मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच संध्याकाळी साडे सहा वाजता चेन्नी हे राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन्याचा दावा करणार असल्याचं स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्रीजी, महिला-मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर तुमचा हा जोर दाखवा इथे नाही – चित्रा वाघ
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- किरीट सोमय्या स्थानबद्ध ? फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- खळबळजनक! मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे आदेश; सोमय्यांचा गंभीर आरोप
- ‘उद्धव ठाकरेंनी मला धमक्या देण्यापेक्षा मुश्रीफ, परब, सरनाईक यांना अटक केली पाहिजे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
