🕒 1 min read
मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापुरात येत आहेत. सोमय्या यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यासह कागल मतदारसंघात काही ठिकाणीही भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्याची तयारी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सुरू आहे. यामुळे संघर्षाची चिन्हे आहेत.
आपला दौरा जाहीर केल्यानंतर काही वेळातच किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदेश दिल्याचा सनसनाटी आरोप सोमय्या यांनी केलाय. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईवर भाजपकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे. ‘महाराष्ट्रात ही तर आणीबाणीच. भ्रष्ट्राचार उघडकीस येऊ नये म्हणून किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई त्यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त. या राज्यात १०० कोटीच्या वसुलीचा आरोप असलेले माजी गृहमंत्री त्यांना शोधल जात नाही मात्र भ्रष्टाचार काढणाऱ्या सोमय्या यांच्यावर वर कारवाई,’ असं ट्विट करत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान साधला आहे.
महाराष्ट्रात ही तर आणिबाणीच. भ्रष्ट्राचार उघडकीस येऊ नये म्हणून @KiritSomaiya यांच्यावर कारवाई त्यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त.
या राज्यात १०० कोटीच्या वसुलीचा आरोप असलेले माजी गृहमंत्री त्यांना शोधल जात नाही मात्र भ्रष्टाचार काढणाऱ्या #kiritsomaiya वर कारवाई— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 19, 2021
सोमय्या यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय ?
किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात ते म्हणतात की, ‘ठाकरे सरकारची दडपशाही. माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी आहे. माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी आणि हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी आदेश दिलेत.’ तसेच सोमय्या म्हणाले की, ‘मी मुलुंड निलम नगरहून ५.३० ला निघणार, आधी गिरगाव चौपाटी गणेश विसर्जन आणि तिथून ७.१५ वाजता CSMT स्टेशन महालक्ष्मी एक्स्प्रेसने रवाना होणार आहे.’
https://twitter.com/KiritSomaiya/status/1439528417586679811?s=20
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गैरव्यवहार सिद्ध झाल्यास मी कोणतीही शिक्षा भोगीन, अन्यथा सोमय्यांना जन्माचीच अद्दल घडेल’
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- किरीट सोमय्या स्थानबद्ध ? फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- खळबळजनक! मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे आदेश; सोमय्यांचा गंभीर आरोप
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
