🕒 1 min read
पुणे : पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध असून देश-विदेशातून भव्य सोहळा पाहण्यासाठी लोक येत असतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा उत्सव पुण्यात साजरा करण्यात येत असून सार्वजनिक गणेशोत्सवाला आता सव्वाशे (१२५) हुन अधिक वर्षांची परंपरा आहे. मात्र, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे यंदा देखील अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जावा अशा सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. पुणे महापालिकेकडून देखील यासाठी मार्गदर्शक नियमावली जाहीर करण्यात आली होती.
दरम्यान, आज गणेशोत्सवाचा अखेरचा म्हणजेच अनंत चतुर्दशीचा दिवस असून गणेश विसर्जनासाठी देखील कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीला बंदी घालण्यात आली असून नद्यांमध्ये विसर्जन न करता घरगुती गणपती हे शक्यतो घरच्या घरी तर ज्या मंडळांना शक्य असेल त्यांनी जागेवर हौद निर्माण करून वा महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रामध्ये मुर्त्यांचे विसर्जन करावेत असं आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सार्वजनिक मंडळांनी खास आरास केली नसली तरी मोठ्या प्रमाणावर पुण्यासह आजूबाजूच्या गावातील नागरिक हे दर्शनासाठी गर्दी करत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पुणे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात असली तरी गणेशोत्सव काळात पुण्यामध्ये कोरोनामध्ये फारशी वाढ न झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ‘महाराष्ट्र देशा’ शी बोलताना दिली आहे.
यामुळे खरच बाप्पा पुणेकरांना पावला असं सध्या म्हणता येईल. मोहोळ म्हणाले, यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान राखून साजरा करण्यात आला. त्यामुळेच गणेशोत्सवाच्या दहा दिवसात कोरोनामध्ये वाढ न झाल्याचे दिसून आलं आहे. याचे सर्व श्रेय पुणेकरांना जाते. येत्या काळात देखील पुणेकरांनी काळजी घ्यावी. यासोबतच, कोरोनाचे संकट हे दूर व्हावे आणि पुढील गणेशोत्सव हा पारंपरिक पद्धतीनुसार जल्लोषात साजरा केला जावा अशी बाप्पाचरणी प्रार्थना केल्याचे देखील महापौर मोहोळ यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गैरव्यवहार सिद्ध झाल्यास मी कोणतीही शिक्षा भोगीन, अन्यथा सोमय्यांना जन्माचीच अद्दल घडेल’
- मुख्यमंत्र्यांनी राज्यात ‘शरिया’ लागू करणे बाकी ठेवले आहे’, भातखळकरांची टीका
- मनोहर भोसलेच्या अडचणी वाढल्या; बारामती कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी
- खळबळजनक! मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे आदेश; सोमय्यांचा गंभीर आरोप
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
