🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक महिन्यांपासून नाटके लॉक्ड झाली आहेत. नाट्य कलाकारांचे मीटर कधी डाऊन होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ज्याच्या शिवाय होऊ शकत नाही असा कलांचा अधिपती गणपती बाप्पाच्या आगमनामुळे कोरोना संपून जावा अशी इच्छा नाट्य कलाकार व्यक्त करत आहे. नाट्यवल्ली या संस्थेने ‘महामारीची भैरवी झाली, आता नाटकाच्या नांदीसाठी कान आतूर झालेत’ असा संदेश देत शुक्रवारी कॅननोट परिसरात जनजागृती केली. यावेळी स्वतः गणपती बाप्पा अवतरले होते.
गेली कित्येक महिने हि रंगभूमी कलाकारांची वाट पाहतीये. कोरोनाने सर्व काही ठप्प केले आणि सतत बागडणारी, हसणारी रंगभूमी देखील शांत झाली. मार्च महिन्यात कोरोनाने सर्वत्र आपले पाय पसरवायला सुरुवात केली. आणि मानवाच्या सर्व गोष्टींवर बंधने आली. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसल्याने सर्वकाही सुरळीत सुरू झाले आहे. मात्र अजूनही कलाकारांचे ‘लॉकडाऊन’ संपलेले नाही.
अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. काही ताकदीच्या कलाकारांनी तर दुसरे व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता तरी शासनाने नाटकांना परवानगी द्यावी अशी मागणी नाट्यकलाकार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी कॅनॉट परिसरात नाट्यवल्ली तर्फे जनजागृती करण्यात आली. तेजस सूर्यवंशी या कलाकाराने गणपती बाप्पाची वेशभूषा करत शासनाने नाटकांना परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी प्रांजल हुसे, स्वराज सरकटे, तत्विका मराठे यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- मुंबई ATS अॅक्शन मोडमध्ये; बॉम्बस्फोटाचं प्लॅनिंग करणाऱ्या ‘मुन्ना भाई’ला मुंब्रातून अटक
- ओला ई-स्कूटरची दोन दिवसात तब्बल ११०० कोटींची विक्री
- पाकिस्तानी खेळाडूच्या ‘त्या’ ट्विटवर किवी क्रिकेटपटूचे चोख प्रत्युत्तर
- इव्हेंट खत्म; एकाच दिवशी अडीच कोटी लोकांच्या लसीकरणावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
