Share

अफगाणिस्तानमध्ये भारतीय गुंतवणूक सुरु राहणार?; गडकरींनी दिले उत्तर

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर तेथे रोख पैशांची कमतरता जाणवू लागली आहे. जागतिक मदत बंद झाली असून बँक खात्यांमधून रोज पैसे काढण्याची देखील मर्यादा ठरविण्यात आली आहे. दरम्यान, आता अफगाणिस्तानमध्ये भारतीय गुंतवणुक राहणार का? यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे आज(१९ सप्टें.) यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

यासंदर्भात माध्यमांशी बोलत असतांना गडकरी म्हणाले की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्रमंत्र्यांशी तेथील सद्यस्थितीवर चर्चा केल्यानंतर या युद्धग्रस्त देशात पुढील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतील. भारताने अफगाणिस्तानमध्ये अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले आहेत. काही प्रकल्प अजूनही प्रलंबित आहेत’. तसेच ‘आम्ही तिथे एक धरण बांधले आहे. आम्ही अफगाणिस्तानमधील जल संसाधन क्षेत्रात काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे ठरवतील की भारत आता अफगाणिस्तानमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करेल की नाही.’ असेही गडकरी म्हणाले.

दरम्यान, २००१ साली तालिबानची राजवट संपल्यानंतर भारताने अफगाणिस्तानबरोबर नव्याने संबंध प्रस्थापित करत अफगाणिस्तानमध्ये ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. भारताने अफगाणिस्तानमध्ये अनेक महत्त्वपूर्ण रस्ते, धरणे, शाळा रुग्णालये इत्यादी महत्त्वपूर्ण बांधकामांची उभारणी केली. भारताने आतापर्यंत ३ अब्ज डॉलरपेक्षा जास्त पैशांची गुंतवणूक केल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!