Share

‘..यामुळे शेलारांनी मध्यावधी निवडणुकांचे भाकित केले’, चंद्रकांत पाटलांचा खुलासा

Published On: 

पुणे : राज्यात लवकरच निवडणूक लागू शकते, दोन पक्ष आम्हाला तसे संकेत देत आहेत, असे नवे भाकित भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शुक्रवारी पुणे येथे केले होते. मावळमध्ये बोलताना ते म्हणाले की, ‘जेव्हा केव्हा मावळच्या विधानसभेची निवडणूक होईल, तेव्हा इथे लिहिल्याप्रमाणे आपलं मावळं, आपलं कमळंच होईल. याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. ज्या पद्धतीने तीन पक्षांमध्ये आपापसात विसंवादाची रोज लढाई लागली आहे आणि त्या तीन पक्षातल्या दोन पक्षांचे जे (शिवसेना आणि राष्ट्रवादी) संकेत आम्हाला येतायत. या सगळ्याचा अभ्यास केला तर अनुमान असा काढता येऊ शकतो की, राज्यात निवडणूक केव्हाही लागू शकेल’, असे वक्तव्य केले होते.

यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे. शेलार यांनी नेमके कोणत्या आधारावर हे भाकित वर्तवले याबद्दल पाटील यांनी भूमिका मांडली आहे. भाजपा मध्यावधी किंवा नियमित निवडणुका झाल्या, तरी आपल्या ताकदीवर निवडणुका लढवेल. विधानसभेच्या २८८ किंवा लोकसभेच्या ४८ जागा लढवण्याची देखील आमची तयारी आहे. आशिष शेलारांचं विश्लेषण या आधारावर आहे की इतके भांडूनही हे कुणी बाहेर पडत नाहीत. भांडणाचे दोनच परिणाम होतात. एक तर आघाडीतून बाहेर पडणे किंवा दुसरे म्हणजे निवडणुकीला सामोरे जाणे. हे बाहेर पडतच नाहीत, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांकडून आता आघाडीतच निवडणूक लढवण्याची भाषा केली जात आहे. ‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत तिघांनी एकत्रित लढण्याचा आमचा मानस असल्याचे’ राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुणे येथे येथे स्पष्ट केले.

यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.’गेल्या ६-८ महिन्यांपासून नाना पटोले स्वबळाची भाषा करत आहेत, परंतु तरीदेखील निवडणुका जवळ येताच त्यांची एकत्र येण्याची तयारी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडे एकत्र लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही’ अशी टीका पाटील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!