Share

JNU Violence : मांसाहार केल्यावरून ABVP आणि JNUSU आमने-सामने; वाचा सविस्तर

Published On: 

नवी दिल्ली: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतीगृहात काल (१० एप्रिल) मोठा राडा झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांचे दोन गट आमने-सामने आल्याने पुन्हा एकदा हिंसा झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी मांसाहाराला विरोध करत विद्यार्थ्यांवर हल्ला केला, असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छात्र संघाने (JNUSU) केला आहे. या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावत जेएनयूएसयूमधील काही विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला विरोध केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येथील वातावरण गंभीर बनले होते.

दरम्यान पोलीस उपायुक्त मनोज सी. यांनी या घटनेबाबत माहिती दिली असून जेएनयूमध्ये झालेल्या या संघर्षामध्ये १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लवकरच घटनेचा तपशील दिला जाईल असे मनोज सी. यांनी सांगितले आहे.

दरम्यान वसतीगृहात झालेल्या हिंसाचारानंतर अभाविप आणि जेएनयूएसयूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध आंदोलन करत घोषणाबाजी केली. यामुळे वसतीगृह परिसरात तणावकारक वातावरण निर्माण झाले होते. जेएनयू नेहमीच काही न काही कारणाने चर्चेत असते. आता मांसाहार केल्यावरून ABVP आणि JNUSU आमने-सामने आल्याने येथे पुन्हा हिंसाचार झाल्याचे दिसून आले.

दरम्यान एबीव्हीपीने गोंधळ घालण्यासाठी ‘मारहाण आणि गुंडगिरी’ केल्याचा आरोप JNUSU ने केला आहे. विद्यार्थी संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, “ते सर्व विद्यार्थ्यांसाठी जेवणाचा मेनू बदलून त्यामधील नेहमीचे मांसाहार काढून टाकल्याबद्दल मेस समितीवर हल्ला करत होते.” जेएनयू आणि तिची वसतिगृहे केवळ एका विशिष्ट वर्गासाठी नसून सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहेत.

महत्वाच्या बातम्या:

किरीट सोमय्या मुलासह फरार, लूकआऊट काढा ; संजय राऊत आक्रमक

“मातोश्रीतल्या ठाकरेंनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात कोण संपलंय…”, ‘मनसे’चे खुले आव्हान

अनिल परब यांच्या ‘त्या’ निर्णयावर भातखळकरांची टीका; म्हणाले, “तुरुंगात असणारे नवाब मलिक…”

“गेली सांगून मवि आघाडी की जनते परीस कुत्रीमांजरी…” , भातखळकरांचा टोला

“कुणीतरी चिथावणी दिल्यामुळे एसटी कर्मचारी…”, शरद पवार यांचा आरोप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!