Share

कोरोनापासून बचाव करण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी सांगितले हे उपाय!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- दिवाळीनंतर पुन्हा राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दिल्लीमध्येही कोरोनाची मोठी चिंताजनक परिस्थिती आहे. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या काळात चांगले काम केले आहे.

कोरोना अधिक वाढला आहे. ही बाब चिंताजनक असून, नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे व हात धुणे या त्रिसुत्रीचा वापर आवश्यक आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

ना.थोरात पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत केलेल्या आरोग्य सर्वेक्षणामुळे महाराष्ट्रात कोरोना रोखण्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र दीपावलीच्या काळात वाढलेली गर्दी पाहता कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता नाकारता येणार नाही.

विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, कुठेही जास्त गर्दी करू नका, घरगुती समारंभ कमीत कमी उपस्थितीमध्ये करा किंवा घरगुती समारंभ टाळा, काही लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबियांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

मागील नऊ महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनामुळे हतबल झाले आहे. महाराष्ट्रात कोरोना रोखण्यात सरकारला चांगले यश आले असून, लॉकडाउनच्या शिथीलतेनंतर मात्र वाढणारी गर्दी हा चिंतेचा विषय ठरला आहे. सणाच्या काळात नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे व वाढणार्‍या थंडीमुळे कोरोना रुग्णांचा आलेख सध्या वाढतो आहे.

त्यामुळे प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टनचे पालन करावे. वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावे. या त्रिसुत्रीचा वापर कोरोना रोखण्यासाठी महत्वाचा ठरणारा आहे, ना.थोरात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!