मुंबई : मुख्यमंत्र्यांचे निवेदन म्हणजे गोंधळलेल्या दिशाहिन नेत्याचे निवेदन असल्याचे दिसून आले. कोरोना रुग्ण संख्या कशी कमी होणार, याचा ठोस कार्यक्रम सरकारकडे नसल्याचे दिसून येते. अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यात मुख्यमंत्री महोदय ५ हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज देत असल्याची घोषणा करतात. मात्र, हा आकडा महाराष्ट्राच्या जीडीपीच्या एक टक्के देखील होत नाही. केंद्र सरकारने जीडीपीच्या १० टक्के आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर टीका केली होती. मग आता तुम्ही तर एकच टक्के आर्थिक पॅकेज देत आहात, यावर देखील पाठक यांनी टीका केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला जेवढ्या कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज दिले, तेवढे पैसे तर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सदनीका दुरुस्त करण्यासाठी दिले आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी कोरोना रुग्ण कसे कमी होतील, यावर काहीही ठोस उपाय केलेले नसल्याची टीकाही त्यांनी केली. एकूण आजच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर आणखी गोंधळाची स्थिती निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
- मुख्यमंत्र्यांनी हवाईमार्गे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पंतप्रधानांना घातली साद
- राजा उदार झाला हाती भोपळा दिला ; मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला
- राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध; फेरीवाल्यांसह ‘या’ घटकांसाठी मदतीची मोठी घोषणा !
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है’
- पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

