पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘मराठी भाषेचा आणि मराठी आस्मितेचा पुळका दाखवणाऱ्यांना साधा अध्यादेशही मराठीतून काढता आला नाही. महाराष्ट्रातील सामान्य जनता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे डोळं लावून बसली होती. पण नेहमी प्रमाणे मोघम बोलून त्यांनी ठोस काहीच दिलेलं नाही. असंघटीत क्षेत्रातील मजूर ते गावगाड्यातील बाराबलुतेदारांचा साधा विचारही या सरकारनं केलेला नाहीये’ अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
मराठी भाषेचा आणि मराठी आस्मितेचा पुळका दाखवणाऱ्यांना साधा अध्यादेशही मराठीतून काढता आला नाही. @CMOMaharashtra#बिघाडी_सरकार #निषेध #मराठी_माणूस #बाराबलुतेदार #गावगाडा.
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) April 13, 2021
पुढचे पंधरा दिवस कडक निर्बंध – उद्धव ठाकरे
‘आता कडक निर्बंधांची आवश्यकता आहे. जीव वाचवणं महत्वाचं आहे. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी मी निर्बंध पाळण्याचे हात जोडून आवाहन करत आहे. उद्या रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवस १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विनाकारण कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. याला जनता कर्फ्यू प्रमाणे जनतेनं मदत करावी. कोरोनाला मदत करणार की सरकारला मदत करणार हे जनतेनं ठरवायचं आहे.’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ब्रेक द चेन : राज्यात उद्यापासून पुढचे पंधरा दिवस आणखी कडक निर्बंध !
- उद्यापासून पुढचे पंधरा दिवस कडक निर्बंध; ‘या’ गोष्टी राहणार सुरु !
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी ‘चेक द ब्रेन’ हे जास्त योग्य आहे; नितेश राणेंचा घणाघात
- पवारांचा रुग्णालयात गुढीपाडवा; अजितदादांनी घेतली भेट, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
- पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

