मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचा 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केला.
प्रकाश जावडेकर पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘आम्हाला आनंद आहे की देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना वेळोवेळी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. आजचा महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे.
यानंतर, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रजनीकांत यांचं अभिनंदन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रजनीकांत यांचं खास शैलीत अभिनंदन केलं आहे. राज ठाकरे यांचे कलाप्रेम हे अनेकदा समोर आलं आहे. कलेची आवड असल्यानेच या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्ती देखील राज ठाकरे यांच्या संपर्कात असतात. आता, राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून रजनीकांत यांचं अभिनंदन केलं आहे.
राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट –
https://www.facebook.com/RajThackeray/posts/1031941817336967
‘रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या हा अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दीपाली चव्हाण प्रकरणी एम एस रेड्डी देखील सहआरोपी, तात्काळ अटक करा’
- ‘पवार साहेब मला आपला मुलगाच मानतात, गुन्हा दाखल होणार नाही’
- महाराष्ट्रासाठी खुशखबर! नितीन गडकरींची मोठी घोषणा
- सर्वसामान्यांना अडचणीत टाकणारी कोणतीही भूमिका भाजपा खपवून घेणार नाही – दरेकर
- #HSC : बारावीच्या हॉल तिकिटाबाबत महत्वाची बातमी; जाणून घ्या कसे मिळवाल हॉल तिकीट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

