Share

#HSC : बारावीच्या हॉल तिकिटाबाबत महत्वाची बातमी; जाणून घ्या कसे मिळवाल हॉल तिकीट

Published On: 

पुणे : कोरोना रोगामुळे देशातील शैक्षणिक क्षेत्रास देखील मोठा फटका बसला आहे. यामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडलं आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) बारावीच्या लेखी परीक्षा या साधारणतः फेब्रुवारी-मार्च दरम्यान होत असतात. मात्र, कोरोना काळामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये नियमित वर्ग न झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अडचणींचा सामना करावा लागला आहे.

यामुळेच, या परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांबाबत आता विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे. बारावीच्या परीक्षांचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) ३ एप्रिलपासून ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत बोर्डाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार २३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परिक्षेचे हॉल तिकीट दिनांक ३ एप्रिल शनिवार पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शाळा/महाविद्यालयांना त्यांच्या लॉग-इन मधून हे हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. याची प्रिंट महाविद्यालय देणार असून त्यावर मुख्यध्यापक, प्राचार्य यांची सही-शिक्का विद्यार्थ्यांना घ्यावा लागणार आहे.

दुरुस्ती असल्यास काय करावे ?

ज्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये विषय, नाव, फोटो व इतर गोष्टींची दुरुस्ती असल्यास महाविद्यालयांनी त्या आपल्या पातळीवर करून त्वरित त्याची कॉपी विभागीय मंडळाला द्यायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!