Share

‘पवार साहेब मला आपला मुलगाच मानतात, गुन्हा दाखल होणार नाही’

Published On: 

पुणे – परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आज करण्यात आला आहे. विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी पीडितेसह भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या अन्यायाला वाचा फोडली.

विटेकर यांनी माझे अश्लील व्हिडीओ केले आहेत, असा खळबळजनक आरोप पीडितेनं केला आहे. वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. अद्याप गुन्हा दाखल करत नाहीत. माझ्याकडे पुरावे आहेत, फक्त तपास सुरू असल्याचं सांगितले जात असल्याचे पिडीतेला  सांगितले जात आहे असा आरोप देखील तिने केला आहे.

राजेश विटेकर यांनी शरद पवार यांच्या पाठबळामुळे माझ्यावर गुन्हा दाखलच होणार नाही, असे सांगून मला घाबरवल्याचे या पीडित महिलेले म्हणणे आहे. शरद पवार मला आपला मुलगाच मानतात त्यामुळे ते माझ्यावर गुन्हा दाखल होऊ देणार नाहीत तसेच पवार साहेब मला अटक देखील होऊ देणार नाहीत असं देखील या पिडीतेला आरोपीने सांगितल्याचे तिने सांगितले आहे.

पुढे बोलताना पीडिता म्हणाली,या महाराष्ट्रात चाललं तरी काय आहे ? महाराष्ट्रात जिवंतपणी मुलीला न्याय मिळणार नाही का ? मी तक्रार करायला गेले तर मला योग्य वागणूक मिळाली नाही उलट माझ्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे असे देखील पिडीतेने म्हटले आहे.

दरम्यान,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसात समोर येत असलेल्या घटनांमुळे राज्यातील महिला सुरक्षित आहेत की नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!