नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामन्याचा आजचा शेवटचा दिवस होता. कांगारुंनी टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले होते. भारताने चौथ्या दिवशी बिनबाद 4 धावा केल्या होत्या.
त्यामुळे पाचव्या दिवशी विजयसाठी आणखी 324 धावांची आवश्यकता होती. सामना रंगतदार स्थितीत होता. मालिका 1-1 ने बरोबरीत होती. भारताला विजयाची संधी होती. यामुळे टीम इंडिया आज पाचव्या दिवशी कसा खेळ करणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. सर्वच खेळाडूंनी संयमी खेळी केली. सामना ड्रॉ होणार की भारतीय संघ आपल्या खात्यात हा सामना जमा करून ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण करणार, याकडे देशवासियांचं लक्ष होतं.
या युवा संघातील शुभमन गिल, रिषभ पंत यांच्यासह अनुभवी चेतेश्वर पुजाराने केलेल्या खेळीमुळे भारत विजयाच्या जवळ आला. अखेर पंतच्या चौकाराने टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला. यानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने आपल्या खास शैलीत भारतीय संघाचं अभिनंदन करतानाच ऑस्ट्रेलियाला जबरदस्त टोला लगावला आहे.
‘आनंदाने वेडा. हा नवा भारत आहे. घरात घुसून मारतो. ऍडलेडमध्ये जे घडले त्यापासून या तरुणांनी आम्हाला आयुष्यभराचा आनंद दिला आहे. विश्वचषक जिंकले आहेत परंतु हे विशेष आहे. आणि हो, पंत हे अतिरिक्त विशेष कारण आहे.’ असं ट्विट करतानाच त्याने एका ट्रक मागे लिहिलेल्या वाक्याचा फोटो देखील शेअर केला आहे.
Khushi ke maare pagal. This is the new India. Ghar mein ghuskar maarta hai.
From what happened in Adelaide to this, these young guys have given us a joy of a lifetime. There have been World Cup wins but this is special.
And yes,there is a reason Pant is extra special . pic.twitter.com/3CAQIkAuwq— Virender Sehwag (@virendersehwag) January 19, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘या युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या मातीत सर्वात मोठा विजय मिळवून दिला’
- ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण ! पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं भारतीय संघाचं अभिनंदन
- ‘मी यापुढे मार्गदर्शक म्हणून काम करणार’, पेरे पाटील यांची राजकारणातून निवृत्ती?
- सिल्लोडच्या ५५ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा दावा
- औरंगाबाद शहरात २३ मजली इमारत उभारता येणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

