Share

औरंगाबाद शहरात २३ मजली इमारत उभारता येणार

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात भविष्यात ७० मीटर म्हणजेच २३ मजल्यांची इमारत उभी करता येईल. १५० चौरस फुटापर्यंतच्या बांधकामाला महापालिकेकडून परवानगी घेण्याची गरज राहणार नसल्याची माहिती राज्याचे नगररचना संचालक सुधाकर नांगनुरे यांनी औरंगाबादमध्ये दिली.

नगररचना विभागाने तयार केलेली एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली राज्य सरकारने ३ डिसेंबर २०२० पासून लागू केली आहे. या नियमावलीची सर्व सामान्य नागरिकांसह विभागातील अधिकारी, वास्तूविशारद, अभियंता यांना माहिती व्हावी या उद्देशाने क्रेडाई आणि मनपातर्फे कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी संचालक सुधाकर नांगनुरे यांनी नवीन विकास नियमावली कशा पद्धतीने राबविण्यात येणार आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. १५० चौ.मी च्या वर ३०० चौ.मी. पर्यत भूखंडधारकांना केवळ दहा दिवसांत परवानगी देण्याची तरतूद नवीन नियमावलीत करण्यात आली आहे. यामुळे सदनिका पुरवठ्यात वाढ होऊन मध्यमवर्गीयांसाठी स्वस्त दरात घरे उपलब्ध होणार आहेत. झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ४ इतका चटईक्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!