औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील ८३ पैकी ५५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने तर ५१ ग्रामपंचायतंवर भाजपने दावा केला. तालुक्यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांच्या पॅनलचा पालोदमध्ये पराभव झाला. भाजयुमोचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवसेनेचे केशवराव तायडे, भाजपचे नेते सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्रीरंग साळवे, पंचायत समितीचे उपसभापती शिवसेनेचे काकासाहेब राकडे यांच्या पॅनललाही मतदारांनी धक्का दिला.
शिवना, अजिंठा, अंभई, डोंगरगाव, घाटनांद्रा, केऱ्हाळा, आमठाणा ग्रामपंचायतीत शिवसेनेने तर उंडणगाव, भवन, अंधारी, भराडी, पळशी येथे भाजपा मित्रपक्षांच्या पॅनलने बाजी मारली. गेवराई सेमी या एकमेव ग्रामपंचायतीत भाजप-शिवसेनेची युती होती. तेथे त्यांना विजय मिळाला.
माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांनी मांडणा, भाजपाचे प्रदेश सचिव ईद्रीस मुलतानी यांनी तांडाबाजार, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर यांनी गोळेगाव (खुर्द व बुद्रुक), शिवसेनेचे बाजार समिती सभापती अर्जुन गाढे यांनी कोटनांद्रा, पंचायत समितीच्या सभापती कल्पना संजय जामकर यांनी आमठाणात वर्चस्व प्रस्थापित केले. भराडी ग्रामपंचायत गजानन महाजन यांच्याकडेच राहिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘या युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या मातीत सर्वात मोठा विजय मिळवून दिला’
- ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण ! पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं भारतीय संघाचं अभिनंदन
- ‘मी यापुढे मार्गदर्शक म्हणून काम करणार’, पेरे पाटील यांची राजकारणातून निवृत्ती?
- ‘इंदिरा गांधीही पराभूत झाल्या होत्या’, मुलीच्या पराभवावर पेरे पाटलांची प्रतिक्रिया
- येस बँकेला दिलासा ! निर्णायक बोर्ड मीटिंगच्या पार्श्वभूमीवर शेअर वधारले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

