Share

ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण ! पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं भारतीय संघाचं अभिनंदन

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया  : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामन्याचा आजचा शेवटचा दिवस होता. कांगारुंनी टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले होते. भारताने चौथ्या दिवशी बिनबाद 4 धावा केल्या होत्या.

त्यामुळे पाचव्या दिवशी विजयसाठी आणखी 324 धावांची आवश्यकता होती. सामना रंगतदार स्थितीत होता. मालिका 1-1 ने बरोबरीत होती. भारताला विजयाची संधी होती. यामुळे टीम इंडिया आज पाचव्या दिवशी कसा खेळ करणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. सर्वच खेळाडूंनी संयमी खेळी केली. सामना ड्रॉ होणार की भारतीय संघ आपल्या खात्यात हा सामना जमा करून ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण करणार, याकडे देशवासियांचं लक्ष होतं.

या युवा संघातील शुभमन गिल, रिषभ पंत यांच्यासह अनुभवी चेतेश्वर पुजाराने केलेल्या खेळीमुळे भारत विजयाच्या जवळ आला. अखेर पंतच्या चौकाराने टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळवत ऑस्ट्रेलियाला लोळवलं आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या विजयानंतर भारतीय संघाचे तोंडभरून कौतुक केलं आहे. ‘ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या यशाने आम्ही सर्वजण आनंदी आहोत. त्यांची उल्लेखनीय उर्जा आणि उत्कटता सर्वत्र दिसून आली. त्यांचा उत्कृष्ट हेतू, उल्लेखनीय धैर्य आणि दृढ संकल्प होता. संघाचे अभिनंदन! आपल्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा.’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!