मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामन्याचा आजचा शेवटचा दिवस होता. कांगारुंनी टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले होते. यामुळे टीम इंडिया आज पाचव्या दिवशी कसा खेळ करणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. सर्वच खेळाडूंनी संयमी खेळी केली. सामना ड्रॉ होणार की भारतीय संघ आपल्या खात्यात हा सामना जमा करून ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण करणार, याकडे देशवासियांचं लक्ष होतं.
या युवा संघातील शुभमन गिल, रिषभ पंत यांच्यासह अनुभवी चेतेश्वर पुजाराने केलेल्या खेळीमुळे भारत विजयाच्या जवळ आला. अखेर पंतच्या चौकाराने टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळवत ऑस्ट्रेलियाला लोळवलं आहे. या विजयांनंतर या युवा संघाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
या कसोटी मालिकेत यष्टीरक्षक रिषभ पंत व ऑल राउंडर वॉशींग्टन सुंदर यांनी आपली चमक दाखवून दिली आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने या दोन्ही खेळाडूंचं खास कौतुक केलं आहे. ‘काही वर्षांपूर्वी अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये पंत आणि सुंदर या दोन खेळाडूंनी आक्रमक खेळी करत बंदूकच चालवत होते. कोणी विचार केला असेल की हे दोन खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या मातीत भारताच्या सर्वात मोठ्या कसोटी विजयांपैकी एक विजय मिळवून देतील’ असं ट्विट करतानाच सेहवागने या दोन्ही खेळाडूंचा अंडर-१९ वर्ल्ड कप वेळीच एक फोटो देखील शेअर केला आहे.
A few years ago, these two Pant and Sundar were going great guns at the Under 19 world cup.
Who would have thought a few years later, these two on Australian soil will take us on course to one of India's greatest test wins . pic.twitter.com/FEfozghPP6— Virender Sehwag (@virendersehwag) January 19, 2021
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंवरील संकट दूर होण्यासाठी नगरसेवकाचे तब्बल दोन किलोमीटरपर्यंत दंडव
- ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण ! पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं भारतीय संघाचं अभिनंदन
- ‘मी यापुढे मार्गदर्शक म्हणून काम करणार’, पेरे पाटील यांची राजकारणातून निवृत्ती?
- ‘इंदिरा गांधीही पराभूत झाल्या होत्या’, मुलीच्या पराभवावर पेरे पाटलांची प्रतिक्रिया
- येस बँकेला दिलासा ! निर्णायक बोर्ड मीटिंगच्या पार्श्वभूमीवर शेअर वधारले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

