🕒 1 min read
औरंगाबाद :राज्यात सर्वच विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेवर राज्यपालांचा प्रतिनिधी म्हणून सेक्शन ३० (४) सी अनुसार व्यक्तीची निवड करताना राज्य शासनाच्या शिफारशीनुसार त्या व्यक्तीची नेमणूक करून विद्यापीठ व्यवस्था स्वतःच्या ताब्यात घेण्याचा आघाडी सरकार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीऐवजी राजकीय व्यक्ती व्यवस्थापन परिषदेवर शासन नियुक्त करणार आहे. सरकारद्वारे विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचा हा निर्णय असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा. अशी मागणी विद्यापीठ विकास मंचच्या वतीने करण्यात येत आहे.
विधिमंडळाच्या सुरू असलेल्या या अधिवेशनात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील बदल विधान भवनात ठेवण्यात आला. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना राज्यातील विद्यापीठांच्या प्र-कुलपती पदी नियुक्त करावी. ही शिफारस आणि विद्यापीठांचे कुलगुरु नेमण्यासाठी राज्य सरकारची दोन नावांची शिफारस म्हणजे शिक्षणाला राजकीय अड्डा बनवण्याचा आघाडी सरकारचा घाट आहे. अभ्यास विद्यापीठ विकास मंचने तीव्र विरोध दर्शविला असून यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील सिनेट व्यवस्थापन परिषदेतील प्रातिनिधिक सदस्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी(Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली.
तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत कुठलीही ठोस भूमिका राज्य शासनाने न घेता शैक्षणिक क्षेत्रातील स्वायत्त असणाऱ्या विद्यापीठांत महाराष्ट्रातील आघाडी सरकारने स्वत:च्या मंत्र्यांचीच प्र -कुलपती म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेणे म्हणजे शिक्षण व्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा. अशी मागणी विद्यापीठ विकास मंचचे महाराष्ट्र सचिव डॉ. गजानन सानप, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, प्रा.डॉ. भगवान सिंग डोभाल असे महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांचे सिनेट व मॅनेजमेंट काउन्सिलचे प्रातिनिधिक सदस्य यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय या सरकारने”, सदाभाऊंचा हल्लाबोल
- ‘शिवसेनाप्रमुख कोण होते, तेही सांगून टाका?’, भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल
- “ऑक्सिजन प्लांट सज्ज करण्याच्या काळात झोपा काढल्या…”, भातखळकरांची टोपेंवर टीका
- ‘खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले’, शिवसेना आ.चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र
- “नवाब मलिक स्वतःला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश समजतात काय?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
