🕒 1 min read
मुंबई : राज्यभरात २४ डिसेंबर रोजी रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी (२५ डिसें.) रोजी पत्रकार परिषद घेतली. यात ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी लॉकडाऊन करण्यात येईल, असे राजेश टोपे म्हणाले होते.
याबाबत अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘ऑक्सिजन प्लांट सज्ज करण्याच्या काळात झोपा काढल्या, आता अशी विधाने करावीच लागणार.’ असे आ. भातखळकर म्हणाले आहेत.
ऑक्सिजन प्लांट सज्ज करण्याच्या काळात झोपा काढल्या, आता अशी विधाने करावीच लागणार…. pic.twitter.com/373z0N46FG
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 26, 2021
दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. याला अनुसरून राज्यभरात २४ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी लॉकडाऊन करण्यात येईल, असेही ते म्हणाले आहेत.
पुढे राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ओमिक्रॉनचे रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. हे वेळीच रोखण्यासाठी खबरदारीची पावलं उचलणं गरजेचे होते. त्यामुळेच लग्न समारंभ, हॉटेल्स, सिनेमा हॉल्स याबाबत निर्बंध जारी करण्यात आले आहेत. या सर्व निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे, असेही टोपे यावेळी म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- “स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे तोऱ्यात वावरत आहेत”, राऊतांचा राेखठोकमधून मोदींवर प्रहार
- “लोकसभेच्या गॅलरीतून डोकावणारे पत्रकार ही लोकशाहीची खरी…”, लोकसभेत पत्रकार बंदीवर राऊतांची टीका
- मंदिर बांधून देऊ म्हणणाऱ्यांनी ७०० शेतकऱ्यांचे बळी घेतले-खा. संजय राऊत
- पंतप्रधान मोदींची घोषणा; ‘या’ तारखेपासून सुरु होणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
- पंतप्रधान मोदींची घोषणा; ‘या’ तारखेपासून सुरु होणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
