Share

‘खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले’, शिवसेना आ.चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : जळगावात शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांच्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. एकनाथ खडसे यांनी आमदाराच्या ड्रायव्हरची एका महिलेसोबतची अश्लील ऑडिओ क्लिप असल्याचा दावा खडसे यांनी केला होता. यावर आता पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असून खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की,’एकनाथ खडसे यांचे संतुलन बिघडले आहे. खडसे यांची मुलगी मारण्याची भाषा करते. मधल्या काळात ही खडसेंनी माझ्यावर खोटेनाटे आरोप केले होते. त्यांची परिस्थिती चोरासारखी झाली आहे. तसेच एकनाथ खडसेंनी एका महिलेसंदर्भात भाषणात अपशब्द वापरला. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईत कलम ५०९ खाली गुन्हा दाखल आहे. ३० वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी होता. पण तुमच्या सारखा खोटारडा माणूस महाराष्ट्राला लोकप्रिय झाला नाही’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे पाटील म्हणाले की, एकनाथ खडसेंचा पोलिसांवर दबाव आहे. दबावाचे राजकारण करून खोटे गुन्हे दाखल करण्याची नीती खडसे कुटुंबीयांची आहे. कोणती ऑडिओ क्लिप दाखवता?असा सवाल करत ऑडिओ क्लिपशी माझा संबंध असला तर मी आमदारकीचा राजीनामा देईल, असेही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!