Share

“नवाब मलिक स्वतःला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश समजतात काय?”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पेनड्राईव्हचे सोर्स काय असा सवाल करत निशाणा साधला होता. तसेच भाजपचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायदे परत आणले जाऊ शकतात, असे म्हंटल्यावरुनही नवाब मलिकांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

याबाबत भातखळकर यांनी ट्विट केले आहे. ‘नवाब मलिक स्वतःला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश समजतात काय?’, असा सवाल भातखळकरांनी केला आहे.

नवाब मलिक म्हणाले होते, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जो पेनड्राईव्ह दाखला त्या पेनड्राईव्हाचा सोर्स काय आहे? हे त्यांनी सांगणं बंधनकारक आहे. त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन भरती, बदल्या यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यांनी स्वत: सांगितलं होतं की माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे आणि ते मी केंद्रीय यंत्रणांना देणार आहे. आता पेनड्राईव्ह कुणी दिला याची माहिती देणं हे बंधनकारक आहे.

आता काही लोकांच्या बाबत मी बोललो, त्याची चौकशी केंद्र सरकारच्या काही मागास आयोगाच्या आदेशानंतर त्याची चौकशी सुरू होईल. मी जी कागदपत्रे, व्हिडिओ सादर केले पोलिसांनी तपासासाठी माझा जबाब घेतला आणि त्याचे सोर्स काय आहे, हे मी त्यांना सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीसांकडे जर तो पेनड्राईव्ह होता, त्याचा सोर्स काय आहे हे त्यांनी सांगणं बंधनकाकर आहे. त्यांनी ते सांगितलं पाहिजे. माझे सोर्स मी सांगू शकत नाही, असं होऊ शकत नाही.”

शासकीय कार्यालयातून छुप्या पद्धतीने जर कोणी काही माहिती पेनड्राईव्हमध्ये घेतली असेल आणि ती माहिती त्यांच्याकडे आली असेल तर ती कोणी दिली याची माहिती देणं हे बंधनकारक आहे. डेटा लिकचा बऱ्याचसा धंदा या राज्यात झालेलाच आहे. काही ओएसडी लोकांनी डेटा चोरलेला देखील आहे याची देखील आज ना उद्या चौकशी सुरू होईलच. असे नवाब मलिक एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!