Share

हे राजपुत्रांनी राजपुत्रांसाठी चालवलेलं सरकार, भाजप आमदाराचा आरोप

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार हे राजपुत्रांनी राजपुत्रांसाठी चालवलेलं सरकार असल्याचा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी आदित्य ठाकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांना टॅग करुन टीका केलीय. महापोर्टलवरुन भाजपच्या वतीने राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यातच राम सातपुते यांनी अशा प्रकारे टीका केलीय.

ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील अनेक निर्णय रद्द ठरवले होते. त्यात महापोर्टल बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याच बरोबर लवकरच नवे पोर्टल आपण सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, एका वर्षानंतरही नवे पोर्टल सुरू झालेले नाही. त्यामुळे भाजपच्या वतीने ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे.

या संदर्भात आमदार राम सातपुते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारवर टीका केलीय. ते म्हणाले की, ‘महापोर्टल मार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द तर केला पण पुढे काय?? सत्ताधारी पक्षाचे बगलबच्चे पोसण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भावनांशी कधीपर्यंत खेळणार? हे राजपुत्रांनी राजपुत्रांसाठी चालवलेलं सरकार आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!