🕒 1 min read
जयपूर – राजस्थानमध्ये विविध ठिकाणी विजा कोसळून काल 22 लोकांचा मृत्यू झाला. जयपूरजवळच्या आमेर किल्ल्यावरच्या टेहळणी मनोऱ्यावर वीज पडल्यामुळे 11 लोक मृत्यूमुखी पडले आणि त्याहीपेक्षा जास्त लोक जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मनोऱ्याजवळ सहलीसाठी एकत्र आले होते. यातले काहीजण पावसामध्ये सेल्फी घेत असताना वीज कोसळली.
राज्य आपत्ती निवारण दल आणि पोलीस पथकांनी सुमारे 29 जणांचा जीव वाचवला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रात्री उशिरापर्यंत इथं बचावकार्य सुरू होतं. कोटा जिल्ह्यातल्या कनवास नावाच्या खेड्यात 4 बालकांचा तर ढोलपूर जिल्ह्यातल्या कोडिन्ना गावात 3 बालकांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केलं. अशी माहिती जयपूरचे पोलिस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी दिली आहे.
अमेर किल्ल्याजवळ वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराचा आढावा घेण्यासाठीर राजस्थानचे आरोग्यमंत्री डॉ. सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयात पोहोचले. यावेळी चीफ व्हिप डॉ.महेश जोशी, आमदार अमीन कागजी हे उपस्थित होते. जखमींच्या उपचारासाठी त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
राजस्थानमधील वीज दुर्घटना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आपण या दुर्घटनेनं व्यथित झालो असून मृतांच्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त करत असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यपाल कलराज मिश्र आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वेब सिरीजनंतर क्रीडाविश्वात ‘समांतर’ची पुनरावृत्ती! सचिन-मेसीची सारखीच कहाणी
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- लोकसंख्येचा विस्फोट होत असेल तर कायदा गरजेचाच – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

