Share

हा मोदी सरकारचा धूर्तपणा; सचिन सावंत यांची टीका

Published On: 

मुंबई : सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले जात आहेत. महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा केल्या बद्दल भाजपचे पदाधिकारी या संबंधी पोस्ट करत आहेत. मात्र, यातच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पोस्टवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केलीय. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या ऑक्सिजनसाठी मोदी सरकारच्या परवानगीची गरज नसल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

या संदर्भात पोस्ट करत सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटले की, ‘आपण जी यादी दाखवून मोदीजींना श्रेय देत आहात, त्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. १२५० मे.टन ही महाराष्ट्राची निर्माण क्षमता आहे. यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे. महाराष्ट्राची ऑक्सिजन उत्पादन क्षमता महाराष्ट्रातील प्रकल्पाद्वारे १२५० मे.टन आहे. एमव्हीए सरकारने १५ ते ३० एप्रिल या १५ दिवसांत २५००० मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता व्यक्त केली होती. १७५०० मे.टन महाराष्ट्राची क्षमता होती. केंद्राला ७५०० मे.टन म्हणजे ५०० मे.टन/दिन द्यायचे होते. परंतु ३४५ मे.टन/दिन मिळत आहे. उरलेल्यासाठी वाहतूक अडचण येत आहे, कृपया खोटे बोलणे थांबवा.’

ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर बरोबरच लस पुरवठ्यावरुनही भाजप आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यात आता रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होत असल्याचे दिसत आहे. मात्र, तरी देखील नेत्यांचे आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!