🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. खडसे यांच्यावर किडनीची एक महत्त्वाचे ऑपरेशन होणार आहे. त्यासाठीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. पुण्यामधील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे आज मुंबईतील सेशन कोर्टामध्ये अनुपस्थित राहिले होते. याच अनुपस्थितीसंदर्भात कोर्टाला माहिती देताना वकिलांनी खडसे आजारी असल्याचे सांगितले
खडसेंच्या वकिलांनी दिलेल्या माहितीवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शंका उपस्थित करत टीका केली आहे. एकनाथ खडसे हे न्यायालयासमोर खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियावरून केला.
SHOCKING
Lies after Lies
Eknath Khadse's lawyer has made a statement before the Hon'ble Sessions court that Shri Khadse is PERMANENTLY DISABLED???
Also that he has been admitted in an ICU and to undergo a LIFE SAVING SURGERY?
Lies only to avoid physical appearance at court?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) October 6, 2021
‘आज सत्र न्यायालयात खडसेंच्या वकिलांनी खडसेंबाबत माहिती दिली. खडसेंना अपंगत्व असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. हा खोटेपणाचा कळस आहे. न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर न राहण्यासाठी हे खोटे सांगितले जात आहे’, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
फडणवीस सरकारच्या कालावमध्ये महसूल मंत्री पदी असताना खडसेंनी पुण्यातील भोसरीमधील ३.१ एकर जमीनीचा एमआयडीसीमधील प्लॉट खरेदी करण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ साली करण्यात आला. या जमीनीची किंमत ३१ कोटी रुपये इतकी असून ती केवळ ३ कोटी ७० लाखांना विकण्यात आलाचा दावा करण्यात आला आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ साली तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे.
खडसे यांनी १२ एप्रिल, २०१६ रोजी या प्रकरणासंदर्भात बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा या प्रकरणात करण्यात आलाय. या बैठकीनंतर अवघ्या पंधरवड्यातच उकानी यांनी खडसेंच्या नातेवाईकांना म्हणजेच पत्नी आणि जावयाला भूखंड विकला होता.
दमानिया यांच्या तक्रारीनंतर एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या पुण्यातील भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. या प्रकरणात त्यांचे जावई गिरीश चौधरी अटकेत आहेत. दरम्यान, या व्यवहारात मदत केल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना ईडीने गेल्या आठवड्यापूर्वी अटक केली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. सोमवारी पीएमएलए न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना गुरुवारपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- तुटपुंजी मदत नको, मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज द्या; कराडांची राज्य सरकारकडे मागणी
- वडिलोपार्जित पतौडी राजवाड्यातील उत्पन्नाबाबत सैफने केला खुलासा..!
- नवाब मलिकांच्या आरोपांवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण, म्हणाले..
- औरंगाबादेत पुन्हा बरसला जोरदार पाऊस, झाडे कोसळून वाहने चकनाचूर!
- दोन दिवसांच्या अंधारानंतर लातूरमधील ‘त्या’ गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

