औरंगाबाद : गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र अपघाताची मालिका वाढतच आहे. बुधवारी दुपारी अर्धाच तास जोरदार बरसलेल्या पावसाने शहरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा सत्र न्यायालयात महाकाय वृक्ष कोसळून वाहनांचे नुकसान झाले, तर अनेक वाहने चकनाचूर झाली आहेत.
औरंगाबाद शहरासह मराठवाड्यात गेल्या काही दिवसात पावसाने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला होता. शहरात पडणाऱ्या पावसाने आतापर्यंत सरासरी ओलांडून सरासरी पेक्षा १६० टक्के अधिक पाऊस पडल्याचे नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. शनिवारी पहाटेच्या पावसाने तर शहरात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली होती. पादचारी पूल वाहून गेल्याने नागरिकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क जवळपास तुटला होता.
बुधवारी दुपारी झालेल्या पावसाने शहरात पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा न्यायालयात महाकाय वृक्ष कोसळले आहेत. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. अनेक वाहने चकनाचूर झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात ठिकठिकाणी अशाप्रकारे झाडे कोसळल्याने रस्ते जॅम झाले आहेत. पावसाने होणाऱ्या नुकसानात दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महिलाविषयक कौटुंबिक कायद्यांच्या जनजागृतीची गरज – यशोमती ठाकूर
- नवाब मलिकांच्या आरोपावर मनिष भानुशालीचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- राज्य सरकारने पंचनाम्यांची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करावी, खा. भागवत कराडांची सूचना!
- ‘माझ्या नवऱ्याची..’मधील ‘राधिका’चा नवा अवतार; चाहत्यांचे वेधले लक्ष
- भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते – जयंत पाटील–
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
