Share

वडिलोपार्जित पतौडी राजवाड्यातील उत्पन्नाबाबत सैफने केला खुलासा..!

Published On: 

मुंबई : बॉलीवूडमध्ये अनेक घराणेशाहींचे राज्य पहायला मिळते. यापैकी एक म्हणजे पतौडी घराणे देखील लोकप्रिय आहे. नुकतेच एका कार्यक्रमात अभिनेता सैफ अली खान ने वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक किस्से शेअर केले. यावेळी त्याने वडिलोपार्जित पतौडी राजवाड्यातील उत्पन्नाबाबत एक मजेशीर खुलासा केला.

दरम्यान छोटया पडद्यावरील ‘द कपिल शर्मा’ या विनोदी शोमध्ये चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी अभिनेता सैफ, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम हे कलाकार पाहायला मिळाले. ‘भूत पुलिस’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक किस्से शेअर केले. यावेळी त्याने वडिलोपार्जित पतौडी राजवाड्यातील उत्पन्नाबाबत एक मजेशीर खुलासा केला. नुकतंच कपिल शर्माने सैफ अली खानला ‘तांडव’ या वेबसीरिजबद्दल काही प्रश्न विचारले होते.

या चित्रपटाची शूटिंग पतौडी पॅलेसमध्ये करण्यात आली. यावेळी कपिलने सैफला एक गोंधळून टाकणारा प्रश्न विचारला. कपिल म्हणाला, ‘सैफ तू या चित्रपटात सर्वात जास्त कमाई अभिनेता म्हणून केली की तुझी मालमत्ता भाड्याने देऊन?’ यावर सैफने ‘दोन्हीही’ असे हसत हसत उत्तर दिले. यानंतर सैफ म्हणाला की, ‘पतौडी पॅलेसमधून येणारा पैसा हा शर्मिला टागोर घेते. तो संपूर्ण पैसा माझ्या आईकडे जातो. मी फक्त नावाला नवाब आहे’. सैफच्या या उत्तरानंतर सर्वजण जोरजोरात हसू लागले. त्याची ‘तांडव’ ही वेब सीरिज असून डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, आदी कलाकार त्यात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!