🕒 1 min read
मुंबई : आर्यन खान याच्यावर ड्रग्ज प्रकरणात करण्यात आलेली कारवाई ही बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आर्यन खान, आरबाज खान यांना पकडून एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारे लोक भाजपशी संबंधित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात गेल्या चार दिवसांत एनसीबीनं केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. ‘क्रूझवर टाकलेल्या छाप्यासाठी काही जणांनी आम्हाला माहिती देण्याचे काम केले होते. संपूर्ण कारवाई कायदेशीर पद्धतीनेच झालेली आहे. या प्रकरणात साक्षीदार म्हणूनही आम्हाला काही जणांनी मदत केली आहे. आमच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही’ असे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले. तसेच कारवाईत वैयक्तिकरित्या मदत केलेल्या साक्षीदारांचीही माहिती समोर आणली. त्यात मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांचीही नावे आहेत.
#WATCH | Some allegations levelled against the organisation are baseless and seem to have been with malice & probable prejudice that may have been harboured in retaliation against earlier legal action carried out by NCB: NCB Deputy DG Gyaneshwar Singh in Mumbai pic.twitter.com/zeb7uQ3nUm
— ANI (@ANI) October 6, 2021
दरम्यान, आज मुंबईतील जोगेश्वरी भागात एनसीबीने धाड टाकली. यात १५ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून अब्दुल शेख नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या अटकेत असलेल्या मोहक जयस्वालनं दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. शिवाय क्रूझवरील पार्टीच्या आयोजनाप्रकरणी चौघांना अटक केल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
नवाब मलिकांचा आरोप काय?
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप हे बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, आर्यन खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या मनिष भानुशाली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही फोटो आहेत. त्यामुळे एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि भानुशालीचा संबंध काय?, असा सवाल मलिक यांनी विचारला आहे. एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- महिलाविषयक कौटुंबिक कायद्यांच्या जनजागृतीची गरज – यशोमती ठाकूर
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘महागाईने जनता हैराण झालेली असतानाही मोदी सरकारला जनतेच्या यातना दिसत नाहीत’
- ‘तुझ्यात जीव..’फेम हार्दिक जोशी मालिकेपूर्वी करायचा ‘हे’ काम
- भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
