औरंगाबाद : मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खुप मोठे आहे. या संदर्भात मी स्वत: दौरा केला आहे. अनेकांच्या जमीन खरडल्या गेल्या आहेत. तर उभे पिक वाहून गेले आहेत. इतकेच नाही तर काही ठिकाणी मंदिरे देखील वाहून गेलेली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तुटपुंजी मदत न करता मराठवाड्यासाठी स्वतंत्र पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ज्या प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रासाठी स्वतंत्र पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. त्याच प्रमाणे मराठवाड्यातील नुकसानग्रस्त नागरिकांसाठी पॅकेजची घोषणा करण्यात यावी. तुटपुंजी मदत करण्यात येवू नये, नसता मराठवाड्यावर अन्याय होईल, असेही ते म्हणाले.
या संदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मागितली आहे. त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना मराठवाड्यातील परिस्थिती स्पष्ट करणार असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी महावितरणचे खांब वाहून गेले आहेत. तसेच डीपी खराब झाल्या आहेत. त्यांचीही तातडीने दुरुस्ती आणि नवीन डीपी बसवण्याचे काम होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- महिलाविषयक कौटुंबिक कायद्यांच्या जनजागृतीची गरज – यशोमती ठाकूर
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘महागाईने जनता हैराण झालेली असतानाही मोदी सरकारला जनतेच्या यातना दिसत नाहीत’
- ‘तुझ्यात जीव..’फेम हार्दिक जोशी मालिकेपूर्वी करायचा ‘हे’ काम
- भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
