Share

“…ही आहे पंतप्रधान मोदींची Daily To-Do List”, राहुल गांधींचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: देशभरामधील इंधनाचे दर आज पुन्हा वाढवण्यात आले आहेत. आज इंधनाचे दर प्रति लिटरमागे ८० पैशांनी वाढले आहे.यावरूनच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi ) यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांच्या रोजच्या कामाची यादी म्हणजे पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर किती वाढवायचे? लोकांचे ‘खर्चे पे चर्चा’ कसे थांबवायचे, तरुणांना रोजगाराची रिकामी स्वप्ने कशी दाखवायची, मी आज कोणत्या सरकारी कंपनीची विक्री करावी?शेतकऱ्यांना अधिक लाचार कसे करावे? असा टोला राहुल गांधी (rahul gandhi ) यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान महागाई, इंधनदरवाढ या मुद्यांवरून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या ७ दिवसात इंधनाचे दर ४ रूपयांनी वाढले. निवडणूक असती तर मोदी सरकारने अशी दरवाढ होऊ दिली नसती. भाजपला केवळ सत्ता हवी आहे. जनतेशी देणेघेणे नाही.असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

तसेच ‘गरज सरो, वैद्य मरो’ वृत्तीचे केंद्रातील भाजप सरकार निवडणुका संपताच महागाई भडकवते. या संवेदनहीन आणि निर्लज्ज सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष ३१ मार्चपासून ७ दिवस महागाईच्या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022 : दुष्काळात तेरावा महिना..! दारुण पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादच्या कॅप्टनला १२ लाखांचा दंड

IPL 2022: दारुण पराभवानंतर कर्णधार केन खेळाडूंवर संतापला; म्हणाला ‘या’ कारणामुळे झाला पराभव

IPL 2022: संजू- बटलरच्या खेळीने राजस्थानची विजयी सुरुवात; सामन्यात रचले अनेक रेकॉर्ड्स

मी आमदार, खासदार जन्माला घालणारा माणूस – सदाभाऊ खोत

“त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर…”, ‘त्या’ प्रस्तावावरून भातखळकरांचा शरद पवारांना टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!