Share

“त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर…”, ‘त्या’ प्रस्तावावरून भातखळकरांचा शरद पवारांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: काल (२९ मार्च) दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते. या बैठकीत शरद पवारांनी ( (NCP President Sharad Pawar)) संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अध्यक्षपद भूषवावे यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो संमतही करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या अनेक चर्चांना उधान आले आहे. आता यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

“राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना UPA चे अध्यक्ष करण्याचा ठराव पारित करण्यात आला. त्याऐवजी त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर देशाच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी मिळाली असती. उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचंचे म्हणणे आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपला रोखलं जाऊ शकतं असे या ठरावात म्हटले आहे. देशातील सध्याची राजकीय स्थिती पाहता शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवे. शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते असून संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व सोपवायला हवं. असे या ठरावात म्हटले आहे. दरम्यान यावर काँग्रेस आणि युपीएतील घटक पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

यंदा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात होणार साजरी; ठाकरे सरकारचा निर्णय

शरद पवारांकडे UPA चे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव दिल्लीत मंजूर; राजकारणात मोठ्या घडामोडी

देशात द्वेष आणि असत्यतेच्या राजकारणाच्या युगात तरुणांनी संघटित होणे गरजेचे- शरद पवार

IPL 2022 SRH vs RR : राजस्थान रॉयल्सचा मोठा विजय; मार्कराम, सुंदरने राखली हैदराबादची लाज!

IPL 2022 SRH vs RR : धू-धू-धुलाईच..! पुण्यात घोंगावलं सॅमसन वादळ; हैदराबादला २११ धावांचं आव्हान!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!