पुणे : केन विल्यमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएल २०२२चा पहिला सामना वाईट ठरला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर विल्यमसनवर मोठी कारवाई करण्यात आली. मर्यादित षटकांची गती संथ राखल्याबद्दल केन विल्यमसनला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएल २०२२च्या पाचव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पुण्यात सनरायझर्स हैदराबादचा ६१ धावांनी पराभव केला. प्रथम खेळताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित २० षटकांत ६ बाद २१० धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनने ५५ धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा संघ ७ बाद १४९ धावाच करू शकला. एडन मार्कराम आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही आणि त्यामुळेच संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. याशिवाय संघाने गोलंदाजीदरम्यान अनेक नो बॉलही टाकले, ज्याचा फटका त्यांना सहन करावा लागला.
बीसीसीआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे, की राजस्थान रॉयल्सविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे सनरायझर्स हैदराबादला दंड ठोठावण्यात आला आहे. या मोसमातील ही त्यांची पहिली चूक आहे, त्यामुळे आयपीएलच्या आचारसंहितेनुसार केन विल्यमसनवर १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022: दारुण पराभवानंतर कर्णधार केन खेळाडूंवर संतापला; म्हणाला ‘या’ कारणामुळे झाला पराभव
- IPL 2022: संजू- बटलरच्या खेळीने राजस्थानची विजयी सुरुवात; सामन्यात रचले अनेक रेकॉर्ड्स
- मी आमदार, खासदार जन्माला घालणारा माणूस – सदाभाऊ खोत
- “त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर…”, ‘त्या’ प्रस्तावावरून भातखळकरांचा शरद पवारांना टोला
- शरद पवारांकडे UPA चे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव दिल्लीत मंजूर; राजकारणात मोठ्या घडामोडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

