मुंबई : IPL 2022 चा ५ वा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार केन विल्यमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या गोलंदाजांना हा निर्णय त्यांच्यावरच उलटला आणि राजस्थान रॉयल्सने ६ गडी गमावून २११ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, हैदराबाद संघ केवळ १४९ धावांपर्यंत पोहोचू शकला. ज्यामुळे राजस्थानने ६१ धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.
राजस्थानने(Rajasthan royals) या विजयासह सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले आहेत. सर्वात आधी संजू सॅमसनचा (sanju samson) हा १०० वा आयपीएल सामना होता. तसेच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर ठोकणार खेळाडू बनला आहे. त्याने ११० सिक्सर पूर्ण करत अव्व्ल स्थान गाठले. तर गोलंदाजीत आपल्या फिरकीची जादू दाखवणाऱ्या युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) टी २० मध्ये आपल्या २५० विकेट्स पूर्ण केल्या. रॉयल्स संघासाठी अजून एक रेकॉर्ड म्हणजे राजस्थान IPL इतिहासातील ५०+ च्या फरकाने सर्वाधिक सामने जिंकणारा चौथा संघ ठरला आहे.
सलामीला धुव्वादार खेळी केलेला जॉस बटलरने (jos butler) खेळल्या गेलेल्या सामन्यात आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा तो ७वा वेगवान खेळाडू ठरला आहे. सोबतच राजस्थान रॉयल्सने २१० धावांचा यशस्वी बचाव केला. राजस्थानने IPL इतिहासात ७ वेळा २०० पेक्षा अधिक धावांचा बचाव केला आहे. एकूणच राजस्थानची या हंगामाची सुरुवात गोड विजयाने झाली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मी आमदार, खासदार जन्माला घालणारा माणूस – सदाभाऊ खोत
- “त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर…”, ‘त्या’ प्रस्तावावरून भातखळकरांचा शरद पवारांना टोला
- शरद पवारांकडे UPA चे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव दिल्लीत मंजूर; राजकारणात मोठ्या घडामोडी
- यंदा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात होणार साजरी; ठाकरे सरकारचा निर्णय
- देशात द्वेष आणि असत्यतेच्या राजकारणाच्या युगात तरुणांनी संघटित होणे गरजेचे- शरद पवार


