मुंबई: रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना काल (२९ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधत शरद पवारांनी आयुष्यभर आग लावायचेच काम केले असून त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे, असा घणाघात केला. यावरच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर देत पुढील आमदारकी भेटावी यासाठी त्यांची ही धडपड असल्याचा टोला लगावला होता. त्यांच्यात आता कलगीतुरा उडाल्याचे दिसून येत आहे. यावरच सदाभाऊ यांनी पुन्हा प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.
“मी आमदार, खासदार जन्माला घालणारा माणूस आहे. त्यामुळे तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. बाजारू भाषणं करायची त्यामुळे सदाभाऊ सुपारी बहाद्दर नाही. तुम्ही सुपारी घेऊन ढोल-ताशा वाजवणाऱ्या बँडबाजावाले आहात. त्यामुळे तुमच्या वक्तव्याला महत्वं द्यावं असं काही नाही. वसंतदादांच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? याचा अभ्यास अमोल मिटकरींनी करावा. अमोल एक चांगला वक्ता आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. पण अमोलने राजकारणाच्या या गटारगंरेत आपली वक्तृत्वाची तलवार चालवू नये.”, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
अमोल मिटकरी काय म्हणाले होते?
“शरद पवारांवर बोलताना आपण एवढ्या महान सुर्यासमोर बोलत आहोत तिकडे थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्या तोंडावर उडते इतकं ज्ञान सदाभाऊंना असावं. सदाभाऊंना पुढील आमदारकी टिकवायची आहे. सदाभाऊ किंवा त्यांचा मित्र हे स्वत: बोलत नाहीत. यांचे मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस आहेत असं माझं स्पष्ट मत आहे.” असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते. तसेच आग लावण्याचं भारतातील काम भाजप करत असून ते शरद पवारांचं नाव घेत आहेत. भाजपपासून महाराष्ट्राला धोके निर्माण झाले आहेत. आग कोण लावत आहे हे सर्वांना माहिती आहे. सदाभाऊंच्या बोलण्याला पक्षात काही महत्व नाही. पुढील आमदारकी भेटावी यासाठी त्यांची ही धडपड असल्याचा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला होता.
सदाभाऊ खोत काय म्हणाले होते?
शरद पवार हे महान नेते असले तरी त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीच केले नाही. त्यांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे काम केले. मला वाटते शरद पवार यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे. हे राज्य एवढे होरपळून निघाले आहे की, ते आता थांबले पाहिजे. असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
शरद पवारांकडे UPA चे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव दिल्लीत मंजूर; राजकारणात मोठ्या घडामोडी
यंदा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात होणार साजरी; ठाकरे सरकारचा निर्णय
देशात द्वेष आणि असत्यतेच्या राजकारणाच्या युगात तरुणांनी संघटित होणे गरजेचे- शरद पवार
IPL 2022 SRH vs RR : राजस्थान रॉयल्सचा मोठा विजय; मार्कराम, सुंदरने राखली हैदराबादची लाज!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

