Share

‘या सरकारने महाराजांच्या नावाखाली कर्जमाफीची घोषणा केली आणि शेतकऱ्यांना फसवले’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत. या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचाही समावेश आहे. या यात्रेतील गेवराई येथील सभेत धनंजय मुंडे यांनी कर्जमाफी वरून सरकारवर टीका केली आहे.

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त गेवराई येथील सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी ‘तावडे सांगतात जे घोटाळ्यात आहेत त्यांनी भगव्याला हात लावू नये. आपल्या महापुरुषाच्या फोटोत ज्यांनी पैसे खाले ते आज आपल्याला उपदेश देत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता आहे. आपल्याकडे कुठला विकास झाला का? आज आपण परिवर्तन केले तरच हा विकास होणे शक्य आहे. आपल्या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून सर्व तरुण या सरकारवर तिरस्कार करत आहेत असं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कधीही शेतकऱ्यांला मोर्चा काढावा लागला नाही. पण यांच्या काळात शेतकरी हवालदिल झाला आहे. महाराजांच्या नावाखाली कर्जमाफीची घोषणा केली आणि शेतकऱ्यांना फसवले असा आरोप राज्य सरकारवर केला आहे. या सभेला खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफीवर बोलताना अजित पवार यांनी ‘माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो… परळीकरांनो, मी दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. पहिल्या चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही’ असं विधान केले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!