Share

भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान, म्हणाल्या…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच पक्षांतर करणाऱ्यांच्या यादीमध्ये माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा समावेश आहे.

छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केले आहे. सुळे यांनी ‘प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आजपर्यंत वडिलांची साथ दिल्याबद्दल त्या प्रत्येकाविषयी आदर कायम राहील. तसेच कोणताही नेता पक्ष सोडून जात आहे, त्याचं दुःख वाटतंच. कारण आम्ही खासदार किंवा संघटना म्हणून काम करत नाही, तर एक कुटुंब म्हणून एकत्र असतो असं भावनिक विधान सुळे यांनी केले आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘राष्ट्रवादीची जरी पडझड होत असली, तरी सगळीकडे आमची चर्चा असते. कितीही पक्षाचं नुकसान होऊ दे, चांगलं होऊ दे, मार्केटमध्ये आपलं नाणं अजूनही चालत आहे असं विधान केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस सकारात्मक असलेली सुप्रिया सुळे यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसला आहे. आतापर्यत बऱ्याच नेत्यांनी राष्ट्रवादी सोडली आहे. तसेच काही विद्यमान आमदारही राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत आहेत. त्यात कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा समावेश आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!