Share

‘हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे आंदोलन नाही’, ठाकरेंचा मनसे, भाजपला टोला

Published On: 

मुंबई : कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारकडून दहीहंडी आणि गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु या मुद्द्यावरून मनसे आणि भाजप आक्रमक झाल्याचे दिसून आले. आपली नाराजी व्यक्त करत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ‘तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष,’ असा तिखट प्रश्न विचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरेंच्या अशा प्रशांवर आता आता मुख्यमंत्र्यांनीही चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप आणि मनसेवर अप्रत्यक्षरीत्या टीका करत ठाकरे म्हणाले की,’कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही, हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे’

दरम्यान, पुढे ते म्हणले की,’कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. महाविकास आघाडी सरकार कोणत्याही सण-समारंभांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोराना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल,’ असे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!