Share

…यालाच म्हणतात ‘लिपस्टिक’ दौरा; नितेश राणेंचा पुन्हा एकदा प्रहार

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर आले होते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते हे देखील कोकणामधील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून आढावा घेत आहेत. तर, कोकणाला मदत देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा दौरा हा ‘लिपस्टिक’ दौराअसल्याची टिप्पणी केली आहे. ‘यालाच म्हणतात “लिपस्टिक” दौरा.. मुख्यमंत्री कुठल्याही गावाला भेट नाही…मोजून 10 किमी आतच.. विमानतळावरचा आढावा.. दौरा संपला!!! ईथे.. फडणवीसजींचा 700किलोमीटरचा चा झंझावात…कोकण सब हिसाब करेगा.. याद रखना शिवसेना!!’ असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!