Share

“वैदयकीय परीक्षा रदद करणे किंवा ऑनलाईन घेणे नियमानुसार संयुक्तिक ठरत नाही”, – अमित देशमुख

Published On: 

लातूर: सध्या कोवीड१९ प्रादुर्भावाची परिस्थिती आहे, हे जरी खरे असले तरी या कारणास्तव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही आणि न्यायालयानेही त्यास परवानगी दिलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे वक्तव्य पालक मंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्णपणे काळजी घेतली जाईल, असेही आश्वासन यावेळी त्यांनी दिले आहे.

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १ जून पर्यंत लॉकडाऊन लागू आहे, त्यामुळे २ जून पासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या १० जून पासून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भावात वाढ न झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयानी केले आहे. या परीक्षा रदद कराव्यात, त्या पूढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात अशी मागणी काही विदयार्थी करत आहेत. वास्तवीक पाहता वैदयकीय महाविदयालयाकडून शिक्षण घेणारे विदयार्थी भविष्यात डॉक्टर होवुन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विदयार्थ्याच्या परीक्षा रदद करणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तीक ठरत नाही, असे मत त्यांनी सोशल मिडियावरून मांडले आहे.

परीक्षा होणार आहेतच त्यामुळे सर्व विदर्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करून परीक्षेला सामोरे जाणे हिताचे ठरणार आहे. वैदयकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक यांनीही या संदर्भाने विदयार्थी तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करावे व परीक्षेसाठी त्यांना प्रेरीत करावे. मागच्या वर्षातील कोरोनाचे संकट असतांना महाराष्ट्र आरोग्य विदयापीठाने परीक्षा यशस्वीरीत्या घेतली असून त्या सुरक्षीत वातावरणात पार पडल्या आहेत. पुढच्या महिन्यात १० जून पासून वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी विदयार्थ्यांना कोरोना सुरक्षा कवच पुरवले जाणार असून त्यांच्या आरोग्याची सर्वेातोपरी काळजी घेतली जाणार आहे, त्यामुळे विदयार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी, असा विश्वास देखील या वेळी देशमुख यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!