Share

अक्षय कुमारच्या मदतीने मराठवाड्यात पहिली मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट व्हॅन उपलब्ध

Published On: 

लातूर : कोरोना संशयित रुग्णांची कोविड – १९ ची आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळण्यास दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे बाधित रुग्णांवर उपचारासाठी विलंब होत आहे. ग्रामीण भागात रुग्णांचा अहवाल तात्काळ उपलब्ध व्हावा आणि वेळेवर उपचार मिळावेत यासाठी सिने अभिनेता अक्षय कुमार व माय लॅबच्या मदतीने मराठवाड्यातील पहिली मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट व्हॅन उदगीरात दाखल झाली आहे. या फिरत्या आरटीपीसीआर टेस्ट व्हॅनचे लोकार्पण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले.

दुसऱ्या लाटेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून संशयित रुग्णांचे कोविड – १९ चाचणी अहवाल लातूरच्या एकमेव असलेल्या प्रयोगशाळेतून मिळण्यास दोन ते तीन दिवसांचा अवधी लागतो आहे. परिणामी अहवाल येण्यास उशीर झाल्याने संशयित रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आल्यास त्या रुग्णावर दोन ते तीन दिवसांनी उशिरा उपचार सुरू होत आहेत.

संशयित रुग्णांचा अहवाल लवकरात लवकर उपलब्ध होऊन रुग्ण गंभीर होण्यापूर्वी त्याच्यावर उपचार सुरू होणे गरजेचे आहे. या भूमिकेतून उदगीरकरांच्या आरोग्यासाठी येथील लाईफ केअर हॉस्पिटलच्या चेअरमन डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी सिनेअभिनेता अक्षय कुमार यांना मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट व्हॅनची गरज असल्याचे सांगितले. अक्षय कुमार यांनी आरटीपीसीआर टेस्टसाठी लागणारे अत्याधुनिक उपकरणे व माय लॅब यांच्या मदतीने व्हॅन उपलब्ध करून दिली आहे.

मराठवाड्यातील पहिल्या फिरत्या आरटीपीसीआर टेस्ट व्हॅन मुळे उदगीरकरांची सोय झाली असून संशयित रुग्णांचा अहवाल आता काही तासातच उपलब्ध होत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णावर वेळेवर उपचार मिळणार आहेत. या मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट व्हॅनचे लाईफ केअर हॉस्पिटल येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!